Posts

Showing posts with the label गुप्तगोदावरी

LATEST BLOGS

ब्रम्हगिरी आणि आम्ही अनुभवलेली गुप्तगोदावरी | Brahmagiri and the Gupt Godavari we experienced | भ्रमर

Image
ब्रम्हगिरी   पर्वत ना शिक मधील  त्र्यंबकेश्वर मंदिराशेजारी  ब्रम्हगिरी या नावाने वसलेला सुपरिचित गड आहे. गडाचा संपूर्ण सुळकासदृष्य प्रदेश  ब्रम्हगिरी  पर्वत म्हणून ओळखला जातो.  नैसर्गिक सौंदर्याचं वरदान प्राप्त झालेल्या या गडाला ऐतिहासीक महत्व तर आहेच किंबहुना त्याहीपेक्षाही जास्त धार्मिक आणि पौराणिक महत्त्व लाभले आहे. येथील परिसरात काही महत्त्वाच्या पौराणिक आख्यायिका घडल्या आहेत असे मानले जाते.त्या आख्यायिकांपैकी गोदावरी नदीच्या उगमाची पौराणिक आख्यायिका प्रसिद्ध आहे. संपूर्ण ब्रम्हगिरी पर्वत परिसर हा श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वराचा अविभाज्य भाग म्हटले तरी चालेल कारण पुरातन मान्याते नुसार ब्रम्हगिरीला प्रदक्षिणा केल्याशिवाय त्र्यंबकेश्वर तीर्थ यात्रा पूर्ण होत नाही. वर्षा ऋतूत गडाचे सौंदर्य दृष्ट लागाण्या सारखे असते. ब्रम्हगिरीचा संपुर्ण परीसर हिरवागार शालू नेसून रानफुलांनी बहरतो आणि ब्रम्हगिरीच्या कातळ सुळक्यांचा ढगांसोबत लपंडाव सुरु असतो. महादेवाच्या जटेमधून अवनीवरती गंगेने झेप घ्यावी तशी ह्या महादेवाचे ब्रम्हगिरीच्या माथ्यावरून असंख्य जलप्रताप झेप घेत असतात...