सोंडाई भटकंती: एक पावसाळी अनुभव
गडाची माहिती गडाचे नाव: सोंडाई प्रकार: गिरीदुर्ग उंची: १२०० फूट (सुमारे ३६६ मीटर) जिल्हा: रायगड प्रवासासाठी जवळचे ठिकाण: कर्जत रेल्वे स्टेशन (गडाच्या तोंडापासून ११ कि.मी.) जवळची गावे (पायथा): सोंडवाडी आणि वावर्ले प्रवासाचा मार्ग: कर्जत स्टेशनवरून सोंडवाडी गावात जाण्यासाठी ऑटो-रिक्षा उपलब्ध. ट्रेकचा प्रकार: सोपा, पण पावसात मध्यम स्वरूपाचा. गडावर जाण्यासाठी लागणारा वेळ: सोंडवाडीतून १ तास, तर वावर्ले गावातून २ ते ३ तास लागतात. सोंडवाडीतून जाण्याचा मार्ग सोपा व जवळचा आहे. वाहतूक मार्ग (मुंबई-पुणे): मुंबई-पनवेल मार्गे चौक गाठावे. चौकपासून बोरगाव फाटा ६ कि.मी. आणि वावर्ले फाटा ८ कि.मी. अंतरावर आहे. जेवण: गडावर जेवणाची सोय नाही. कर्जत किंवा पायथ्याच्या गावात आधी सांगितल्यास घरगुती जेवणाची सोय होऊ शकते. पावसाळ्या नंतर पर्यटकांची संख्या कमी असल्याने नाश्ता मिळणे कठीण असते. पाणी: गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे, परंतु उन्हाळ्यात टाकीतील पाणी काढण्यासाठी दोर सोबत ठेवावा लागतो. राहण्याची सोय: गडावर राहण्याची सोय नाही, पण वावर्ले किंवा सोंडवाडीतील शाळेत राहण्याची व्यवस्था होऊ शकते. टी...