Posts

Showing posts with the label रामेश्वर मंदिर

LATEST BLOGS

कोस्टल राईड - मुरुड जंजिरा आणि चौल - भाग २

Image
दुसरा दिवस      काल आमचा मुंबई ते दिवेआगार असा जवळपास ३०० किलोमीटरचा प्रवास झाला होता. आज मात्र त्याच्या तुलनेत अगदीच कमी – केवळ १२५ किलोमीटरचा, घरापर्यंतचा प्रवास बाकी होता. दिघीपर्यंतचा हा टप्पा अत्यंत सुखद गेला. कुठे खड्डे नव्हते, ना कुठलाही अडथळा. अगदी आनंददायी प्रवास झाला. मुंबईच्या रस्त्यांपेक्षा कितीतरी पटीने येथील रस्ते चांगले वाटले. रमतगमत आम्ही गाडी चालवत दिघी गावात पोहोचलो. गावात प्रवेश करताच शांतता जाणवली , पण ही शांतता काही वर्षांत हरवेल असं वाटतं. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडोर प्रकल्पांतर्गत दिघी बंदर आता ग्रीनफिल्ड औद्योगिक कॉरिडोरचा हिस्सा बनलंय. अडाणी इंटरनॅशनल पोर्टमुळे दिघी आता जगाच्या नकाशावर झळकतंय. मोठमोठ्या कंटेनरच्या वाहतुकीमुळे या शांत गावाचा कायापालट होणार, आणि कदाचित शांतताही हरवेल. दिघी जेट्टी आणि फेरीचा प्रवास - सकाळी पावणे आठच्या सुमारास आम्ही दिघी जेट्टीवर पोहोचलो. समोर आगारदांडा जेट्टी दिसत होती, आणि पश्चिमेला अडाणी पोर्टच्या हालचाली जाणवत होत्या. आगारदांड्याच्या पश्चिमेला भर समुद्रात अजिंक्य जंजिरा किल्ला आपलं वैभव मिरवत होता. दिघी ते आगरदां...