मुंबईतील दुर्लक्षित आदिवासी आणि त्यांची समृद्ध वारली चित्रकला परंपरा
आदिवासी पाडा गो रेगाव हे मुंबईच्या पश्चिम उपनगरातील महत्त्वाचं स्थान आहे. येथे इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट, नेस्को एक्झिबिशन सेंटर, महानंद दूध डेअरी, आरे मिल्क कॉलनी आणि फिल्मसिटी सारखी महत्त्वाची ठिकाणं आहेत. गोरेगाव मुंबई उपनगराचा भाग होण्यापूर्वी येथेही गावांचे समूह होते. गोरेगावच्या पूर्व भागातील दिंडोशी, पहाडी आणि आरे ही गावं अत्यंत प्राचीन असून, त्यांचा उल्लेख १४व्या शतकातील महिकावतीच्या बखरीत देखील आढळतो. या महिकावतीच्या बखरीत मालाड माहालातील विविध गावांच्या उत्पन्नाचे आणि ते जमा करणाऱ्या व्यक्तींचे तपशील पुढीलप्रमाणे आढळतात: या उपर माहाल मालाडचा उपज त्याचि वगत ।। छ ।। माहाल मालाड व जमीदार श्रीपतराव गोत्र हरीत ।। मालाड भात मुडे ४५५ राजभाग ३५७ धर्म ८ सीळोतर ९ ।। १ ।। गावं पाहाड वजदार कृष्णराव गोत्र कश्यप ।। सरकारभात मुडे २५४ राजभाग १८० सीळोतर ७४ नगद दाम ३००० ।। २ ।। गावं आरें वजदार देवप्रभु गोत्र कौंडण्य ।। सरकारभात मुडे १२७ राजभाग ११४ धर्म १३ सीळोतर ३ नगद दाम १३० ।। ३ ।। गावं वेडे वजदार नारा...