Posts

Showing posts with the label भिवगड

LATEST BLOGS

सहकुटुंब भटकंती आनंददायी करणारा छोटेखाणी भिवगड | भ्रमर

Image
या वर्षीच्या पावसाळ्यात छोटेखानी का होईना पण एखादी तरी भटकंती व्हावी यासाठी कर्जत जवळील भिवगडला भेट द्यायचे ठरवले. कर्जत स्टेशन पासून पाच सहा किलोमीटर अंतरावर भिवगडाच्या पायथ्याशी वसलेली वदप आणि गौरकामत ही दोन गावे. या गावांमधून भिवगडाचा गडमाथा अर्ध्या पाऊण तासात अगदी सहज गाठता येतो.  भिवगड तसा छोटेखानी. समुद्र सपाटीपासून उंची जेमतेम अंदाजे ८२५ फुट (२५१ मीटर) पेक्षा जास्त नाही आणि वाट एकदम सोपी. याच्या बाजूलाच खेटुन अंदाजे शंभर फुटावरुन झेप घेणारा धबधबा म्हणजे पावसाळी भटकंतीसाठी उत्तम पर्याय. या सगळ्या जमेच्या बाजू लक्षात घेउन, कुणी सोबती असले तर ठीकच नाहीतर एकला चालो रे च्या धर्तीवर या गंडभेटीसाठी उद्या सकाळी निघायचेच असा मनाशी निच्छय केला. सोबती कुणी असेल तर उत्तमच म्हणून व्हॉट्सअँपवर वर मित्रांना माझ्या भिवगडाच्या प्लॅन बद्दल सांगितले. माझ्या सोबत संदेश आणि ॐकार यायला तयार झाले. पहाटे CST वरुन निघणाऱ्या ६:१६ च्या ट्रेन ने आम्ही तीघे कर्जत स्टेशनला पायउतार झालो.  कर्जत स्टेशन जवळील रिक्षा स्टॅण्ड जवळ रिक्षाची चौकशी केली असता आम्ही पहिलटकर असल्याचा गैरफायदा घेऊन गाव जणु खूप...