Posts

Showing posts with the label Trek

LATEST BLOGS

नाइट ट्रेक नाणेघाट ते जिवधनगड | Naneghat to Jivdhan Fort night trek | भ्रमर

Image
नाणेघाट कल्याण द्वार ट्रेकिंग पॉइंट     अरुण आणि संतोषने कोजागिरी पौर्णिमेचा योग साधून  नाणेघाट  -  जीवधनचा नाइट ट्रेक प्लॅन केला होता. शनिवारी रात्री निघायचे असल्याने मला नाही म्हणायचे काही कारण नव्हते. माझ्या बरोबर संदेश, विजय आणि अशित ट्रेकला यायला तयार झाले होते तर अरुणचा दहा वर्षाचा  मुलगा आर्यन त्याच्या सह्य भटकंतीमधील पहिल्याच नाईट ट्रेकसाठी खूपच उत्साही होता. ठरल्याप्रमाणे शनिवारी रात्री कल्याणला जमा झालो. संदेशची गाडी कल्याणच्या दुर्गाडी पुलावरील ट्राफिक मध्ये अडकल्यामुळे नियोजित वेळेपेक्षा बराचसा उशीर झाला होता. संदे श  येताच अरुण  आणि   संदे श च्या गाड्यांमधून   आमचा आठ जणांचा चमू   कल्याण  -  अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरून नाणेघाटाकडे निघाला .  माळशेज  घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या वैशाखरे गावाच्या पुढे  २ कि.मी.  वर असलेल्या नाणेघाटाच्या नामनिर्देश फलकाजवळ  पोहोचेपर्यंत मध्य रात्रीचे १२  : ४५ झाले. ...

वर्षाभटकंती दुर्लक्षित कामणदुर्गाची | भ्रमर

Image
जसजसा पावसाळा जवळ येतो तसे ट्रेकर मंडळीचे पावसाळी भटकंतीचे प्लॅन बनू लागलतात त्यात कित्तेकदा हवशे नवशे गवशे मंडळीचाच भरणा जास्त असतो त्यात ठरावीक गडांवर तर जणू यांची जत्रा भरते. सहा सात वर्षापूर्वी पालघर ठाणे जिल्हातील पच्छिम द्रुतगती मार्गाजवळील गड या जत्रेपासून अलिप्त होते, पण तेथे ही आता हि गर्दी दिसू लागली. या गर्दी पासून अलिप्त अशी एखादी दुर्ग भ्रमंती करावी विचार करत असताना कामण दुर्ग डोळ्यांसमोर आला.  मुंबईच्या सर्वात जवळचा कुठला गिरी-वन दुर्ग असेल तो म्हणजे कामण दुर्ग. मुंबईच्या वेशीपासून अवघ्या विस बावीस किलोमीटर अंतरावर असेलेल्या दुर्गाची समुद्र सपाटीपासून उंची अंदाजे २१४०  फुट / ६५२  मीटर असून हा ठाणे पालघर परिसरातील दुसऱ्या क्रमांकाच उंच किल्ला आहे. चहूबाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेल्या या दुर्गाला शिव पराक्रमांचि साक्ष नसणे आणि फेसबुक सारख्या समाजमाध्यमामध्ये प्रसिद्धीचे वलय नसणे केवळ याच कारणांमुळे मुंबईच्या इतक्या जवळ असूनही हा गड दुर्लक्षित राहिलेला. इतर प्रसिद्ध आणि वलयांकित दुर्गांची एकंदरीत परिस्थिती बघता एका अर्थाने दुर्लक्षित आहे तेच बरे असे ...